राणा दाम्पत्याने भेट दिलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला जलाभिषेक, विविध ठिकाणी गुन्हे दाखल

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणायांचे समर्थकांकडून शहरात जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी राणा दाम्पत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हनुमान चालीसा पठण केली होती. त्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा जलाभिषेक करून धुवून काढला. तर दुसरीकडे राणा दाम्पत्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहे.

राणा दाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी राणा दाम्पत्याना जोरदार विरोध करून राडा केला होता. याच घटनेचा निषेध करत आज भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून शुद्ध केले. यावेळी राणा दाम्पत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने राणा दाम्पत्याच जंगी स्वागत अमरावतीत करण्यात आले होते. मात्र विनापरवाना रॅली आणि वाहतूक अडथळा प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अमरावतीच्या गाडगेनगर, राजापेठ या दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर नांदगाव पेठ व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात युवा स्वाभिमान पक्षाच्या १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढं नेमकं अमरावती पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावतात का हे पहावे लागेल.

गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा संतापले दरम्यान, 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाल्यामुळे रवी राणा कमालीचे संतापले. नियमाचे पालन करून रॅली आणि कार्यक्रम घेतला होता. मात्र आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, आमच्या कार्यकर्त्यांच्या तडीपाराच्या नोटीसा काढत आहे १०-१० मिनिटाने माझे सर्व कार्यक्रम संपले. यापूर्वी मी दिल्लीत असतांना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते, असा आरोपच आमदार रवी राणा यांनी केला.

Team Global News Marathi: