रामदास कदमांना कसली शिक्षा? संजय राऊत म्हणाले की…

 

नाशिक | आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मंत्री दैत्य ठाकरे यांच्यासाठी मतदार संघ सोडणारे माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. मात्र शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. सुनील शिंदे यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. सुनील शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडली होती.

तसेच आज तागायत आमदार सुनील शिंदे यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. त्यांच्या या पक्षकार्याची आणि केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. रामदास कदम यांच्यावर अन्याय झाला का, असे विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले.

Team Global News Marathi: