राज्यपालांमधील ‘रामशास्त्री’ आता जागा झाला, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी लगावला टोला

 

राज्यात महाविकास आघाडी पडल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी आता भाजपा आणि राज्यपाल कोश्यारी यांना टार्गेट केले आहे अशातच आता सिन्र्ग्रेस्स नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यवर घणाघाती टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील रामशास्त्री आता जागा झाला आहे, आतापर्यंत झोपला होता असे म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला.

अध्यक्षपद हे महत्त्वाचं आहे. बाकीच्या मंत्र्यांची पाटी राहील की नाही, पण अध्यक्षांच्या नावाची पाटी मात्र राहील असेही थोरात म्हणाले. देवेंद्रजी तुम्ही त्यांचा कार्यक्रम केला, आता त्यांना भाषण देता येणार नाही. देवेंद्रजी तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले कुणास ठाऊक असेही थोरात म्हणाले. विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर थोरात सभागृहात बोलत होते.

विधानसभा अध्यक्षपद हे पद खूप मोठं आहे. आत्तापर्यंत अध्यक्ष हे खूप अनुभव असलेल्या नेत्याला बनवले जात होते. पण आपण तरुण वयातील अध्यक्ष म्हणून आपलं नाव लागलं. चांगला अध्यक्ष म्हणून तुमचा लौकिक राहील असेही थोरात म्हणाले. अध्यक्ष हा निरपेक्ष, सर्वांना समान वागणूक दिला असावा. आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याशी तुमचे संबंध चांगले आहेत. तुम्ही सगळीकडे गेलेत पण काँग्रेस का बाजूला ठेवली असा टोला देखील थोरात यांनी लगावला.

Team Global News Marathi: