राज्यपाल कोश्यारी होऊ शकतात पदमुक्त, त्या जागी यांची लागणार महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून वर्णी ?

 

काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे नवनवीन वाद निर्माण होत आहेत. या वादांमुळे विरोधकांकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यापार्श्वभूमीवर भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच पंतप्रधान मोदींकडे राज्यपाल पदाचा राजीनामा दिला व आपल्याला पदमुक्त करण्यात यावे,अशी इच्छा व्यक्त केली. यानंतर आता जर कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तर पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याची माहिती आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोदींच्या मुंबई दौऱ्यात, त्यांच्याकडे राजीनामा दिल्याची बातमी आली होती. त्यामुळे कोश्यारी यांना पदमुक्त करण्यात येईल, अशी माहिती आहे.

दरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. मात्र नवजोत सिंह सिद्धू यांच्यांवबरोबर झालेल्या वादामुळे ते जास्त चर्चेत होते अमरिंदर सिंग पंजाब काँग्रेसचे माजी राज्य अध्यक्षही होते. सिंग यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजे होते. सिंग यांनी 1963 ते 1966 या कालावधीत भारतीय लष्करातही सेवा दिली. मोदी लाट असतानाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून त्यांना बहुमताने विजय मिळाला आहे.

काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद व वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या वादावादीमुळे अमरिंदर यांना 18 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) नावाने स्वत:चा राजकीय पक्ष काढला. यानंतर मात्र त्यांनी आपला पक्ष भाजपत विलीन केला आहे.

Team Global News Marathi: