राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नका, अजितदादांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरु केला होता. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवत त्यांना स्थगिती दिली जात होती. त्यामुळे विकास कामांमध्ये राजकारण न आणता कामांना स्थगिती देऊ नये या मागणीसाठी विरोधकांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवीतहानी तसेच वित्तहानीही झाली आहे. मृतांच्या कुटुंबियांना अजूनही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर शिंदे सरकारचे विशेष लक्ष आहे. शिंदे सरकारनं 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे.

या स्थगितीमध्ये अधिकचा निधी हा बारामती नगरपरिषदेसाठीच होता. शिंदे सरकारने केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय दिले आहे. त्याच अनुशंगाने विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विकास कामांना स्थगिती देऊन नये अशी मागणी केली आहे.

शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत

शेतकऱ्यांनो पावसाळ्यात ‘या’ भाज्यांची लागवड करा, मिळेल बंपर उत्पादन व नफा

Team Global News Marathi: