राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनताच उत्तर देईल ; ठाकरे गटाच्या खासदाराचा इशारा

 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य करत शिंदे आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात जे फोडाफोडीचं राजकारण झालं आहे त्याला जनता उत्तर देईल असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस गटाला दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रमाणे राज्यात फोडाफोडीचे राजकारण केले आहे. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार करणे हे येथील लोकांना आवडलेलं नाही असेही ते म्हणाले.

राज्यातील राजकीय व्यक्तिंकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. या व्यक्तींवर कारवाई करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची राज्यातून हकालपट्टी करावी ठाकरे गटाची मागणी आहे. त्यावर संसदेत आवाज उठवण्यात आला मात्र त्याविषयावर आम्हााल बोलू दिलं नाही, असेही निंबाळकर म्हणाले.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सीमावादावरही आवाज उठवत त्यांनी केंद्राची काय भूमिका आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आम्ही अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली होती, मात्र ते भेटले नाहीत आणि हे दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. आता ओमराजे निंबाळकर यांच्या या टीकेला शिंदे गातील खासदार काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: