राज्याच्या विविध भागात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा !

 

राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही भागात तुफान पाऊस झाला या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. ओढ्यावरील पुलाचा अंदाज न आल्यामुळं दुचाकीस्वार गेल्याची घटना देखील घडली. औसा तालुक्यातील लामजाना, अपचुंदा, जयनगर परिसरात अवघ्या तीस मिनिटात ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला. या पावसामुळं छोट्या मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांला प्रचंड पाणी आले.

नागपूरमध्येही देखील पाऊस पडत आहे. अनेक भागात दमदार पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागात मेघगर्जनेसह तासभर पाऊस बरसला. पावसाच्या या धुवाधार बॅटिंगमुळे शहरातील रस्ते आणि चौक जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. तासभर मुसळधार बरसल्यावर नंतर पावसाची रिपरिप सुरु होती. जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Team Global News Marathi: