राज्यात सात हजार पोलिसांची भरती; पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरणार

 

महाराष्ट्रातील पोलीस दलात लवकरच सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृहविभागाकडून सांगण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने या भरतीला यापूर्वीच मंजुरी दिली होती. तथापि, राज्यात कोरोनाकाळामुळे ही भरती प्रक्रिया हाती घेता आलेली नव्हती.

तसेच होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबिली जाईल. ही प्रक्रिया एकाचवेळी हाती घेतली जाईल आणि एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्यात येणार आहे. पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल.

या आधी पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरून पोलीस पदांचा अनुशेष दूर करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असेल. या निमित्ताने पोलीस दलात सहभागी होण्याची मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.

काेराेना संकट तसेच पाेलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली अद्ययावत नसल्याने पाेलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही. गडचिराेलीत पाेलीस शिपायांच्या १३६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७, इतर प्रवर्गाला ३ ते ७ जागा आहेत.

Team Global News Marathi: