सीताफळात अर्ली छाटणी प्रयोगाचा खामगाव च्या राजेंद्र ठोंबरे यांना झाला फायदा

सीताफळात अर्ली छाटणी प्रयोगाचा खामगाव च्या राजेंद्र ठोंबरे यांना झाला फायदा ; मिळवला प्रतिकिलो 180 रुपये दर

सोलापूर : काही शेतकरी शेती करत असताना ती पारंपारिक पद्धतीने न करता सातत्याने नवीन प्रयोग करून उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. असाच एक भन्नाट प्रयोग बार्शी तालुक्यातील खामगाव येथील सीताफळ उत्पादक शेतकरी राजेंद्र ठोंबरे यांनी करून यशस्वी करून दाखवला आहे. त्यानी जूनमध्ये होणारी फळ छाटणी मार्च मध्येच केली आणि अन्य सीताफळाच्या तुलनेत तीन- साडेतीन महिने आधीच फळ बाजारात आणल्याने त्यांच्या सीताफळाला दिल्ली बाजारपेठेत १८० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

श्री. ठोंबरे हे प्रगतशील सीताफळ उत्पादक
आहेत. त्यांच्याकडे २५ एकरांवर
संकरित वाणाचे सीताफळ आहे. पूर्वी त्यांच्याकडे दोन एकर द्राक्ष बाग ही होती़ मात्र त्यातून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते.म्हणून ठोंबरे यांनी सिताफळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ते लावण्यासाठी चांगली असलेली द्राक्षाची बाग मोडून टाकली. त्यानंतर महिन्यात अडीच बाय अडीच फुटाचे खड्डे घेऊन त्यात गावखत व सुपर फॉस्पेट टाकून जूनमध्ये पाऊस पडल्यावर  जून २०१५ ला  सिताफळाच्या संकरित जातीची आठ बाय सोळा अंतरावर लागवड केली.

साधारण या सर्व बागेचा बहर धरण्यासाठी
जूनमध्येच छाटणी करून पुढील व्यवस्थापन केले जाते.पण यंदा त्यांनी नवा प्रयोग म्हणून सीताफळाची तीन महिने आधीच (अर्ली) छाटणी करून बहार धरला आहे .सध्या या बागेतील फळकाढणी सुरू झाली आहे.दुसरीकडे बाजारात देशी आणि गावरान सीताफळाची आवक सुरू झाली आहे.संकरित व सुधारित वाणाची सिताफळे बाजारात नाहीत.त्यामुळे त्याचा फायदा ठोंबरे यांच्या वाणाला मिळत आहे.

आतापर्यंत त्यांनी तीन तोड्यांतून तीन टन सिताफळ दिल्ली बाजारात पाठवला आहे. साहजिकच, मागणी वाढल्याने त्यांना सध्या १८० रुपये प्रतिकिलो एवढा दर त्यांच्या सीताफळाला मिळतो आहे.
मार्चमध्ये पाच एकवरील सीताफळाची

अर्ली छाटणीचा फायदा
• सीताफळाला मुळात पाणी कमीचलागते. त्यामुळे मार्चमध्ये छाटणी करूनही उन्हाळ्यात पाण्याचा ताण
बसला नाही.

• दरवर्षी जूनमध्ये बहर धरल्यानंतर पावसाळी वातावरणामुळे किमान दहा फवारण्या घ्याव्या लागतात.
पण यंदा लवकर छाटणी केल्याने मार्च- एप्रिलमध्ये वातावरण पूर्णतः कोरडे राहिले.

• केवळ पाच फवारण्यांमध्ये काम झाले. शिवाय पुढेही फारशा फवारण्या लागल्या नाहीत.

• पावसाळ्यात तणाची समस्या मोठी असते, मशागतीचा खर्च वाढतो,पण उन्हाळ्यात तण कमी असल्याने
मजुरांचा खर्चही वाचला.

• अर्लीमुळे फळांची संख्या कमी राहिली,पण फळाचा आकार आणि गुणवत्ता
उत्तम मिळाली.

• आणखी किमान महिनाभर हंगाम
चालेल एकरी अंदाजे पाच टन उत्पादन
मिळेल. त्यानुसार पाच एकरांतून २५
टनांचा अंदाज आहे.

किसान रेल्वे ठरली फायद्याची

दिल्ली मार्केटला सीताफळ पाठवली जातात. किसान रेल्वेमुळे ही सोय झाली आहे. सांगोला, दौंड, कुर्डूवाडी या स्थानकावरून हा माल ते पाठवतात.अगदी प्रतिकिलो २ ते ३ रुपये प्रवास भाड्याने माल थेट दिल्लीत पोहोचतो.
त्यामुळे वाहतूक खर्चातील बचत हाही एक उत्पन्न वाढण्याचा मार्ग आहे.


पुन्हा नव्याने पाच एकरांवर सप्टेंबरमध्ये उशिराची छाटणी करून बहर धरला आहे. या प्लॉटची काढणी
अन्य सीताफळाच्या तुलनेत उशिरा होईल.
यंदा अर्लीच्या प्रयोगामुळे दर मिळालाच, पण
अतिरिक्त खर्चही वाचला. आता उशिराच्या
छाटणीचा प्रयोग केला आहे. बाजारपेठेचा
अभ्यास करून नियोजन केल्यास निश्चितच
चांगला लाभ मिळू शकतो.

राजेंद्र ठोंबरे,
सीताफळ उत्पादक, खामगाव, ता. बार्शी
संपर्क : ९६७३६०६३८७

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: