राज ठाकरेंच्या पुढाकाराने ‘त्या’ ११ पोलिसांचे निलंबन मागे अन् ३०७ कलमही रद्द

 

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेदरम्यान पाटील यांच्या सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते. तर शाईफेक करणाऱ्या युवकावर ३०७ कलमासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याने ‘त्या’ ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. तसेच त्या युवकावर ३०७ कलमही रद्द करण्यात आली.

राज ठाकरे यांच्या मध्यस्थीने शाईफेक करणाऱ्या युवकावरील ३०७ कलम शिथिल करण्यास व ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्यास देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी होकार दिला असल्याचे राज ठाकरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

राज ठाकरे यांचे प्रसिद्धी पत्रक :

लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण ‘मनसे स्टाईल’ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत.

मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात. असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली.

एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल.

Team Global News Marathi: