राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते शेगावमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला विरोध करणार

सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वात्यंत्रवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काळे झेंडे दाखवा असे आदेश राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसैनिकांना दिले आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या बुलढाण्यात पोहचणार असून, शेगाव येथे सभा होणार आहे. शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा असे आदेश राज ठाकरेंनी दिले.

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत होते. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याची ऑफर दिली. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असे सांगत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे देशासाठी अमुल्य योगदान आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: