राज ठाकरेंचे शरद पवारांवरील आरोप हास्यास्पद

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही राज ठकारे यांना खडेबोल सुनावले.

गेल्या ५५ वर्षांपासून शरद पवार राजकरण करत आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

शरद पवारांचे नाव घेतलं तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये,असा टोलाही अजितदादांनी राज ठाकरेंना लगावला. दरम्यान १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच राज्यात जातीपातींचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यादरम्यान केला यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

Team Global News Marathi: