राज ठाकरेंचं संजय राऊतांबद्दल मोठं विधान. महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेने नेते संजय राऊत यांच्याबाबत खूप मोठं सूचक विधान केलं आहे. राज ठाकरे आज दिव्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊतांबाबत एक विधान केलं. त्यांच्या त्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ‘संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची प्रॅक्टिस करावी’, असं धक्कादायक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत.

संजय राऊत यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचानालया अर्थातईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून ठाकरे सरकार कोसळण्याबाबतच्या वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचंय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे ईडीने आतापर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. तसेच अनेकांना नोटीस बजावली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे सध्याचे विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये आहेत.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर भाजपकडून त्या आरोपांचं खंडन केलं जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय यंत्रणांचा तपास हा भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील असून ही कारवाई आगामी काळात आणखी तीव्र होईल, असा इशारा दिला आहे.

Team Global News Marathi: