राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा तोफ धडाडणार

 

मुंबई | मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण तापले आहे अशातच राज ठाकरेंच्या आज औरंगाबाद मध्ये होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय.

अशातच आता भारतीय जनता पार्टीकडून देखील देवेंद्र फडणवीसांच्या बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. फडवणीसांची ही सभा मुंबईच्या सोमय्या मैदान चुनाभट्टी-सायन येथे होणार आहे. मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते राज्यातील विविध घोटाळ्यांबाबत देवेंद्र फडणवीस बोलणार असल्याचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये पोहोचले असून मनसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. ढोल आणि ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. राज्यातील सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची औरंगाबाद येथील सभा चर्चेत आहे.

राज ठाकरे यांच्या या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं काल केला. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबरोबरच राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या रिक्षांमार्फत शहरात या सभेचा प्रचार करण्यात येत आहे. याच प्रचार रिक्षांचा काल मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: