राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ‘किआन, कोणी सुचवलं हे नाव ?

 

मुंबई | 5 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली बोर्डे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. बाळाचा जन्म झाल्यापासून या बाळाचे नाव नेमके काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता होती. मात्र, आता बाळाचं बारसं झालं आहे. आणियानुसार बाळाचं नाव ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. शीवतीर्थ निवासस्थानी हा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे.

बाळाचं नाव हे किआन असं जाहीर करण्यात आल असून या नावाचा अर्थ काय? तर मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय बोर्डे म्हणजेच बाळाच्या आजोबांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे नाव हे त्याच्या आईनेच म्हणजे मितीली बोर्डे यांनी सुचविले असल्याचे सांगण्यात आले आहे.

खरंतर, किआन या नावाचे अनेक अर्थ आहेत, त्यानुसार ‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव आहे. किआन म्हणजेच या नावाचा अर्थ देवाची कृपा , प्राचीन, राजेशाही असा आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राज ठाकरेंना नातवाच्या नावाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. राज ठाकरे यांनी नातवाच्या नावाविषयी ‘परदीप’ असं मिश्किलपणे सांगितलं होतं.

Team Global News Marathi: