राज साहेब ठाकरे यांचे विचार विरोधकांना झोंबण्याच कारण काय ? – सतीश नारकर

 

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्याला शिवतीर्थावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर सडकुन टीका केली. यावेळी जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेना पक्षाला पूर्ण बहुमत दिलेले असताना दुसरीकडे मात्र अडीज-अडीज वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा मुद्धा बाहेर काढत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या शिवसेना पक्षाला चिमटे काढले होते.

या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला होता तसेच नेटकऱ्यांनी आणि सामान्य जनतेने सुद्धा राज ठाकरे यांच्या मुद्द्याला पूर्ण पाठिंबा दिला होता यावरूनच सर्व सामान्य नागरिकांमध्ये आघाडी विरोधात होत असलेल्या रोषामुळे सत्ताधारी पक्षाच्या अडचणी वाढताना दिसून येत होत्या याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे भाजपासाठी काम करत असल्याची टीका विरोधकांनी सुरु केली होती.

या टीकेला आता मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले होते. आज सर्व सामान्य राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाच्या हातात सत्ता दिलेली असताना या नव्या युतीचा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न नारकर यांनी यावेळी उपस्थित केला. यापूर्वी सुद्धा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या चुका जनतेसमोर आणल्या होत्या त्यामुळे राज साहेब एका पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

‘कर नाही तर डर कशाला’

आज आघाडीच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप होत असताना फक्त केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी सुरु केला आहे मात्र जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा घोटाळा केला नसेल तर मग केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी कशाला आदळा-आपट करता असा प्रश्न सुद्धा नारकर यांनी उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: