राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, मात्र पुण्याच्या सभेत सविस्तर बोलणार

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे.

राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला.

भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली. बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. तसंच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. मात्र आज सोशल मीडियाच्या माद्यमातून त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.

Team Global News Marathi: