राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई, बहिणीलाही कोरोनाची लागण –

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई, बहिणीलाही कोरोनाची लागण –

मुंबई : राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येस असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी खुद्द डॉ. पारकर यांनी ही माहिती दिली आहे.

त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागणी झाली आहे. दोघेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. ते तीन तासांत घरी जातील. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन केले जाईल. त्यांच्या आईदेखील रात्री रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही आम्ही अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. तीन तासानंतर राज यांना घरी सोडले जाईल, अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. यामध्ये दोन अँटिबॉडीजचे मिश्रण आहे. लीलावती रुग्णालयात हेच औषध राज ठाकरे यांना देण्यात येत आहे. या औषधामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही. तसेच ते लवकर बरे होतील.

राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. २३ ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: