ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकतीने लढण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकतीने लढण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात महाविकास आघाडी, भाजपा आणि वांचीतने यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते आता त्यापाठोपाठ मनसेने सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरून या तिन्ही पक्षांना आवाहन दिले आहे. त्यामुळे यंदा राज्यात पार पडणारी ग्रामपंचातीच्या निवडणुकीसामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

या निवडणुकीसाठी येत्या २३ डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: