राज बब्बर काँग्रेसला राम राम ठोकत समाजवादीत करणार प्रवेश

 

 

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आहे अशातच आता बड्या नेत्यांची या पक्षातून त्या पक्षात उडी घेण्याचे प्रकार वाढलेले दिसून येत आहेत अशातच आता आणखी एक बडा नेता काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राज बब्बर हे पुन्हा समाजवादी पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यूपी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मोठी राजकीय उलथापालथही सुरू आहे. आता समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र चालू असतानाच काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या गळतीचा प्रश्नही चर्चेचा विषय आहे. आता काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांची समाजवादीत घरवापसी होण्याचे संकेत समाजवादीच्या प्रवक्त्यांनी दिले आहेत. “काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि अभिनेता राज बब्बर लवकरच पुन्हा समाजवादी होणार आहे.” असे ट्विट फखरूल यांनी केले आहे.

Team Global News Marathi: