पुढील 3 दिवस गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात पाऊसाचा अंदाज; मुंबई-ठाण्यातही शक्यता

पुढील 3 दिवस गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात पाऊसाचा अंदाज;  मुंबई-ठाण्यातही शक्यता

Weather Updates: मुंबई: अवकाळी पावसापासून थोडी उसंत मिळाली असं वाटत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Meteorological Department) पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी गायब झाली असून हवामानात मोठे बदल होत आहेत. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टही आहे.

महाराष्ट्रात 29 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्य़ात आला आहे. तर 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज  आहे. राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची व जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुंबई- ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही या काळात पाऊस, होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: