अवैध सावकारकी प्रकरणी बार्शीत सहकार विभागाची धाड, कागदपत्र जप्त.

 

अवैध सावकारकी प्रकरणी बार्शीत सहकार विभागाची धाड, कागदपत्र जप्त.
—-
बार्शी : अवैध सावकारकी प्रकरणी सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत बार्शी शहरात दोन ठिकाणी धाड टाकली आहे. ही कारवाई सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार साहाय्यक सचिन महाडिक यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या बाबत अधिक माहिती अशी की, सहकार खात्याकडे अवैध सवकारकी प्रकरणी बार्शी येथील मोठ्या सावकाराची तक्रार आली होती. या बाबत सहकार खात्याने प्राथमिक तपास केल्या नंतर या सवकारकी प्रकरणी अनेक जण गुंतल्याचे समोर आले होते. त्या मोठ्या सावकाराच्या वतीने काही लोक वसुलीचे काम करत होते. या बाबत कमालीची गुप्तता पाळत सहकार विभागाने बार्शीतील दोन ठिकाणी आज धाड टाकली.

 

ही धाड कासारवाडी रोड, माऊली नगर येथील रुपाली पंडित क्षिरसागर व रिंग रोड येथील सुलताना नजीम शेख यांचे घरी टाकण्यात आली. या धाडीत स्टॅम्प, चेक या सह अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. या धाडीने अनेक संशयास्पद व्यवहार उघडे होणार असून बार्शीत खोलवर रुजलेली सवकारकीची पाळेमुळे उघडी होणार आहेत. पुढील चौकशीत अनेक धक्कादायक माहिती नक्कीच पुढे येऊ शकते. कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर महाराष्ट्र सावकरी (नियमन) अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे श्री महाडिक यांनी सांगितले.

 

ही धाड सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार सहाय्यक सचिन महाडिक, मनिषा गुप्ता, उमेश मुसळे, प्रांजली झालटे, सुहास राऊत, महादेव जाधवर या सहकार खात्यातील कर्मचारी यांनी टाकली.
—–

ग्लोबल न्युज नेटवर्क: