राहुल गांधींना सावरकरांविषयी केलेल्या विधांविरोधात शिंदे गटाचे जोडोमारो आंदोलन

 

खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील शिंदे गटाचं शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र फिरत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याचं आरोप करण्यात येत आहे.

या विरोधात आता भाजप शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबविण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे राज्यभरात राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांसह महिला वर्ग आंदोलनांत सहभागी होता.

यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय राहुल गांधींच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी प्रवीण तिदमे म्हणाले कि, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हेच विचार बाळासाहेबांची शिवसेना वतीने जाहीर निषेध केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे हा निषेध केला जात आहे.

बाळासाहेबांनी दाखविलेल्या सत्याच्या वाटेवर चालत आहोत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे राहुल गांधींना जाऊन गळाभेट घेत आहेत, हे कुठेतरी चुकीचे आहे. आम्ही जरी बाळासाहेबांच्या रक्ताच्या नात्याचे वारसदार नसू तरी आम्ही विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे राहुल गांधींनी चुकीचे वक्तव्य केले असून शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याचे ते म्हणाले.

 

Team Global News Marathi: