“राहुल गांधी म्हणतात तस चौकीदार ही चोर है” मंत्री बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका |

 

देशात विविध मुद्यावरून केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस करताना दिसून येत आहे. त्यातच आता राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचं काम का केलं जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे, असा सवाल महसूलमंत्री व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय.

राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणलं पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे, असं थोरात म्हणाले. राफेल घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली.

काँग्रेस सरकारच्या सरकारच्या काळातच १२६ राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते. परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे १६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आलं, असा आरोप थोरातांनी केला आहे.

Team Global News Marathi: