राहुल गांधी न घाबरता सरकारला प्रश्न विचारतात, प्रामाणिक लोकच हे करु शकतात – कन्हैया कुमार

 

 

जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमारनं काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या काॅंग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर २८ सप्टेंबर रोजी त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र  कन्हैया कुमार यांच्या प्रवेशानंतर  त्यांच्यावर आणि राहुल गांधीवर अनेक टीका करण्यात आली. अशातच आता सगळीकडून टीका होत असताना कन्हैया कुमारनं राहुल गांधीची बाजू घेतलेली पहायला मिळाली.

 

पंजाब आणि छत्तीसगडमध्ये पक्षांतर्गत मतभेदांवरही कन्हैया कुमारने काँग्रेसचा बचाव केला आहे. सगळीकडून जोरदार टीका होत असताना कन्हैया कुमारनं राहुल गांधींचं कौतुक केलेलं दिसून आलं. राहुल गांधी कोणत्याही भीतीशिवाय सरकारला प्रश्न विचारतात. कदाचित ते ईडीला घाबरत नसल्यामुळं असं असू शकतं. जे प्रामाणिक आहेत तेच कोणत्याही भीतीशिवाय सरकारसमोर प्रश्न उपस्थित करत आहेत.

 

पुढे कन्हैया कुमारनं म्हटलं की, सध्याच्या परिस्थितीला भाजपशी लढण्यासाठी काॅंग्रेस हा एकमेव विश्वासहार्य पक्ष आहे. काँग्रेस हा पक्षातील सर्वात जुना आणि लोकशाहीवादी पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात काही ना काही तक्रार भांडण हे होतच असतात से विधान त्याने केले होते. आता भाजपवर केलेल्या टीकेला काय उत्तर मिळते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: