पुन्हा नवनीत राणांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मी एक महिला आहे त्याशिवाय 25 लाख लोकांमधून निवडून आलेली खासदारही आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही, तर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. असं असताना उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अजून तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे.

पुढे उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाल्या की, ही तर सुरुवात आहे, पिक्चर तो पुरी बाकी है’ असं म्हणून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. जळगाव शहरातील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्यावतीने गणरायाची आरती आणि हनुमान चालीसा पठणासाठी राणा दाम्पत्य जळगावात दाखल झाले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. हनुमान चालीसा पठण कार्यक्रम करीत असताना देशातील लव जिहाद ह्या मुद्यावर नवनीत राणा बोलल्या.

त्या म्हणाल्या की अमरावतीनंतर आज जळगाव जिल्ह्यातून मी सगळ्यांना आवाहन करते की लव जिहाद संदर्भात ज्या ही समस्या आमच्यापर्यंत येतील त्या आम्ही सोडवू. आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता, असंही त्या म्हणाल्या.

Team Global News Marathi: