पुन्हा मोहित कंबोज याने साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल समृध्दी महामार्गासह अनेक प्रकल्पाचे लोकर्पण पार पडले. समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाच्या निमिताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.


ठाकरेंनीही हा मार्ग कुणी आपल्यामुळेच झाला असं समजू नये असे म्हणाले होते. त्यावरुनच आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले की, उद्धव ठाकरे हे ९४३ दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने कुठला एकतरी प्रकल्प उभारला का? एखादा असा प्रकल्प ज्यामुळे इतिहासात त्यांची आठवण कायम राहील. मी ट्रोलर्सच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहे असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.

इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गात अडथळा आणण्याचे प्रयत्न केले. मुंबईतील मेट्रो आरे कारशेड रोखले. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध. वाधवान बंदराला विरोध केला. उद्धव ठाकरे हे विकासाच्या विरोधात का आहेत? असा संतप्त सवालही कंबोज यांनी उपस्थित केला. आता या टीकेला उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: