पुण्याचा चिराग फलोर जेईई ॲडव्हान्स परिक्षेत देशात अव्वल; हे आहेत देशातील दहा टॉपर

ग्लोबल न्यूज – जेईई ॲडव्हान्स 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर हा विद्यार्थी देशात अव्वल आला आहे. आयआयटी मुंबई विभागातील हा विद्यार्थी आहे.

चिराग फलोर हा ‘बाल शक्ती पुरस्कार’ विजेता आहे. जो पुरस्कार 18 वर्षाखालील भारतीय नागरिकांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

चिराग फलोर हा या परीक्षेत कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर ठरला असून, त्याने 396 पैकी 352 गुण मिळवले आहेत. तर, आयआयटी रुरकी झोनच्या कनिष्का मित्तल कॉमन रँक लिस्टमधील सतराव्या क्रमांकासह विद्यार्थीनींमध्ये अव्वल आहे. त्यांनी 396 पैकी 315 गुण मिळवले आहेत.

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

एकूण 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती. पेपर 1 आणि 2 साठी एकूण 43 हजार 204 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स 2020 साठी पात्र ठरले होते.

जेईई ॲडव्हान्स 2020 चे पहिले 10 रँक धारक

रँक 1: चिराग फलोर
2: गांगुला भुवन रेड्डी
3: वैभव राज
4: आर मुहेंद्र राज
5: केशव अगरवाल
6: हार्दिक राजपाल
7: वेदांग धीरेंद्र असगावकर
8: स्वयं शशांक चुबे
9: हर्षवर्शन अग्रवाल
10: धवनित बेनीवाल

ग्लोबल न्युज नेटवर्क: