पुणे सोलापूर महामार्ग वरील वाखारी (ता.दौंड जि.पुणे) गावातील महामार्गावरील पुलाचा भराव ढासळला असून कोणत्याही क्षणी या ठिकाणी महामार्ग खचू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर वाकडपुल येथील एका पुला शेजारील असणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने या ठिकाणी महामार्गावरील भराव वाहून गेला असून, महामार्ग खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले असून, पुलाला मजबुतीकरणासाठी लावलेले माती, दगड वाहून गेले आहेत. महामार्गावरून सध्यस्थितीत वाहतूक होत आहे. एखाद्या जड वाहनांमुळे हा भराव खचूशन काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
त्यातच गुरुवारी देखील दिवसभर पावसाची संततधार सुरूच असल्याने या प्रकाराकडे कोणीही गंभीरपणे पाहिलेले नाही. तर महामार्ग प्राधिकरणचे आधिकारी देखील या ठिकाणी फिरकले नाहीत.