पुण्यातील युवासेचा उपनेत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश

पुण्यातील युवासेचा उपनेत्याचा महाराष्ट्र नवनिर्मान सेना पक्षात प्रवेश

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. त्यातच आता पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा हाती धरला आहे. युवासेना उपनेते संग्राम माळी यांनी शिवसेनेला सोडचिट्टी देत मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर संग्राम माळी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला. दोन महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला.

माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: