पुणे विभाग शिक्षक: शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

पुणे विभाग शिक्षक: शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने संघटनेचे प्रदेश सचिव तथा पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करीत पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आशीर्वाद घेत दत्तात्रय सावंत यांनी अर्ज भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे कोकण विभागाचे चेअरमन आ.बाळाराम पाटील हेही त्यांच्या सोबत होते.

 

आ सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे जाऊन भेट घेतली व त्यांचे आशिर्वाद घेऊन पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल केला. आ सावंत यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी व शिवसेना अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे.

आ. दत्तात्रय सावंत हे पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील असून २०१४ ला ही ते अपक्ष उभा राहून संघटनेच्या बळावर निवडून आले होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहात आवाज उठवला होता. एक डिसेंबर २०२० रोजी निवडणूक होणार आहे, त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (दि.१२) रोजी शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर होताच आ. सावंत यांचे कार्यकर्ते पाच ही जिल्ह्यात शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: