पुणे जिल्हा;महाविकास आघाडीमुळे शिवसैनिक खचला म्हणत पुणे जिल्हा शिवसेना प्रमुखांनी दिला राजीनामा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला राजीनामा

पुणे जिल्हा;महाविकास आघाडीमुळे शिवसैनिक खचला म्हणत पुणे जिल्हा शिवसेना प्रमुखांनी दिला राजीनामा

बेल्हे – जुन्नर तालुक्‍याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.

मागील दोन वर्षांपासून पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. एक शिवसैनिक म्हणून मी आपला प्रथम ऋणी आहे. मागील तीन वर्षांपासून आपले सरकार आले आणि भाजपसोबत आपली 25 वर्षांपासूनची जी युती होती ती आपआपसांतल्या भांडणामुळे तुटली. आपण महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला; परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीमुळे शिवसैनिक खचत व संपत चालला होता.

काही दिवसांपूर्वी आम्ही आपणास भेटलो असताना तुम्ही आम्हाला सांगितले की, नाईलाजाने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी तडजोड करून इथून पुढच्या काळात काम करावे लागेल. वरच्या पातळीचे राजकारण वेगळे आहे; पण खालच्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच राजकारणी नेहमीच संघर्षाचे राहिला आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी आमचे मनोमीलन होणार नाही. यामुळे पदाचा सन्मान ठेवून माझे जिल्हाप्रमुख पद आपल्याकडे सुपूर्द करत आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा कार्यरत राहणार आहे. ही जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आपण दुसऱ्या कोणालाही द्यावी, इच्छा नसतानाही मी आपल्यापासून बाजूला होत आहे, असे सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: