पुण्यात कोरोना लसीचे १००,००० डोस उपलब्ध, ६५०० पोलिसांना टोचण्यात येणार लस

पुणे : संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला सुरवात झालेली आहे. त्यात वरिष्ठ नागरिक आणि अति गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस टोचण्यात येत आहे. त्या पाठोपाठ आता पुण्यात ६५०० पोलीस कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

त्यात लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुन्हा काही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यात पोलीस दलातील ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यातही १६ जण कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात वर्षभरात १ हजार ५३० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच पुणे पोलिसात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेसहा हजार पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ८४ पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात सध्या कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिनच्या ५० हजार आणि कोव्हिशिल्ड लसीच्या ५० हजार डोसचा समावेश आहे.

Team Global News Marathi: