पुण्याचे आयुक्त सौरव राव कोरोना पॉझिटिव्ह,

पुणे आणि त्यांच्या आसपास भागात कोरोना रुग्णसंख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र, अशा स्थितीत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मागच्या एक वर्षभर सौरभ राव यांनी कोरोनाशी लढण्यासाठी रणनिती आखली. पण अखेर आज त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पालकमंत्री अजित पवारांनी विधानभवनात बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली होती. यांनतर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.

सोमवारी दिवसभरात ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यात काल ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकजण पुण्याबाहेरील आहे. पुण्यात सध्या ३७० गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर पुण्यात आतापर्यंत २ लाख १९ हजार २८५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील २ लाख २ हजार ३३९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या ११ हजार ९८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ४ हजार ९६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Team Global News Marathi: