Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 21, 2022
in वाढदिवस विशेष
0
सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो

पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. दादांच्या राजकीय विरोधकांनी खुल्या दिलाने मांडले आहेत. तब्बल एक दशकाहून अधिक काळ दादांसोबत असल्याने मला प्रत्यक्षात ते नेहमीच अनुभवता आले.

प्रत्येक दौऱ्यात दादांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवाय राहत नाही. अजित दादा हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात. अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना अजित दादांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला असतांना त्यांनी स्वतः कचरा उचलत बाजूला केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

बरं ही प्रामाणिक तळमळ फक्त बारामती, महाराष्ट्र किंवा देशापुरता वावरताना मर्यादित नाहीये. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांचा विदेश दौर्यावर असतांना दादांबद्दलचा एक अनुभव सांगितला होता. दुसरं कोणीतरी रस्त्यावर टाकलेले चॉकलेटचे कव्हर दादांनी स्वतः उचलून कचरापेटीत टाकले होते.

 

सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो. बहुतांश राजकारण्यांना त्याचे वावडे असल्याने वेळा न पाळणे ही राजकीय फॅशन झाल्याचे आपल्याला दिसते. वक्तशीरपणाच्या बाबतीत जॉर्ज वॉशिंग्टन यांचे अनेक किस्से अमेरिकेत प्रसिद्ध असल्याचे माझ्या वाचनात आले.

 

आपल्याकडच्या राजकीय नेत्यांसोबत मनोमन तुलना करताना अजित दादांचे नाव प्रकर्षाने त्यात समाविष्ट करावे लागेल. व्यासपीठावरील वा समोरील वेळेत नाही आले म्हणून दादा वेळेची चालढकल करतांना आजतागायत दिसले नाही. कार्यक्रम, बैठक, प्रचारसभा अगदी दिलेल्या वेळीच हजर राहण्याचा पायंडा आजतागायत चुकला नाही.

आजकाल अभ्यागत कार्यकर्त्ये यांच्याकडून पाय पडून घेणेच काय पाय धुवून घेणे वगैरे राजकीय ट्रेंड देशभर शिगेला पोचलेला दिसत असतांना स्पष्टपणे पाटी लावून या सवंग गोष्टींना मनाई करत फक्त कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे.

हाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडणे.
स्पष्टवक्तेपणा, वेळ आणि ‘दिलेला शब्द पाळणे’ या उच्च नैतिक मूल्यांचा राजकारणात ऱ्हास झपाट्याने होतांना दिसतोय. प्रसिद्धीपिपासूपणा, लोकानुनय करण्याचा, खोटं बोलून वेळ मारून नेणे आता साधारण गोष्ट झालेली दिसते. आजपर्यंतच्या स्पष्ट, पारदर्शी कार्यपद्धतीमुळे सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अजित दादांचे वेगळेपण उठून दिसते.

आज आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला अशा अनेक आठवणी, घटना, प्रसंग, क्षण डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. आदरणीय दादा, शतायुषी व्हा! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

⁃ श्री. सुनीलकुमार मुसळे

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अजित पवारवक्तशीरपणावाढदिवस
ADVERTISEMENT
Next Post
कोरोनाचा धोका वाढताच, जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा

कोरोनाचा धोका वाढताच, जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group