पुणे जिल्ह्यात ३०० एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

 

पुणे | पुण्याजवळ ३०० एकर जागेत अत्याधुनिक स्वरूपाची इंद्रायणी मेडीसिटी’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी भरीव तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली. ही वैद्यकीय वसाहत सुरू करता असताना त्यामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असणार आहे.याशिवाय सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल, असे पवार यांनी नमूद केले.पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या २०२२-२३ चा अर्थसंकल्पात ही घोषणा केली.

याशिवाय आरोग्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपयांची एकूण तरतूद केली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी ३ हजार १८३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.११ मार्च १८८६ रोजी पेनसिल्व्हेनिया वुमन मेडिकल कॉलेजमधून एम.डी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय आणि मराठी डॉक्‍टर होत्या. आज या गोष्टीला १३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यांचे स्मरण करून वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागासाठींच्या तरतुदीची माहिती दिली.इंद्रायणी मेडिसिटीसाठी जागेची चाचपणी सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल. जिल्हा आरोग्य सोसायटीतर्फे याचा डीपीआर’ तयार केला जाणार आहे. लवकरच तो राज्य सरकारला सादर केला जाईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) ही मेडिसिटी उभारण्याचे काम केले जाण्याची शक्‍यता आहे.

Team Global News Marathi: