‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, अजित पवार करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा ‘

 

शिंदे सरकारच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. मात्र, हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातो. असाच दावा आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय चिंतन शिबीर सुरू होत आहे. यासाठी अनेक नेते याठिकाणी आले आहे.

शिर्डीमध्ये प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी असा दावा केला आहे, की विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि तेच शासकीय पुजा करतील, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. तेच्या मनात रोष आहे.
आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे आता येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा त्यांनी केला आहे.

मिटकरी फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, की ‘फडणवीस हे भविष्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदीही दिसणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील मोठा पक्ष आहे’. याआधी गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्यातील सरकार कोसळणार असल्चाचं भाकीत केलं होतं. राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार आहे, असं ते म्हणाले होते.

Team Global News Marathi: