‘पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही, तो झाल्यास चाळीसही आमदार..’ सेना खासदारांचा दावा

 

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सह दीपक केसरकरांनी खिल्ली उडवली आहे. याशिवाय त्यांनी उदय सामंत यांनाही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे. विनायक राऊत म्हणाले, की अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

मेळघाटामध्ये कृषिमंत्री गेले, तरी त्याचा काही फायदा नाही. अद्याप याठिकाणी पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा दौरा कशासाठी? शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे. भाजपने मुंबईमध्ये हिंदुत्वाचे जे बॅनर लावलेत ही भाजपची पूर्णपणे नौटंकी आहे.. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी निर्बंध आणून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले. त्यामुळे भाजपने हिंदुत्वाचे बेगडी दर्शन घडवू नये, असा आहे इशारा राऊतांनी दिला आहे.

राऊत मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना म्हणाले, की चाळीसही आमदारांना मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कदापिही होणार नाही.. जर तो करण्याचा प्रयत्न झाला तर हे चाळीसही आमदार एकामेकांच्या उरावर बसतील. दसरा मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले, की दीपक केसरकारांनी आमची चिंता करू नये. भाजपच्या लोकांचे पाय चेपून मिळवलेलं मंत्रिपद पहिल्यांदा सांभाळा.. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चिंता करू नका. दसरा मेळावा घेण्याचा फक्त आणि फक्त अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे असे प्रतिउत्तर विरोधकांना दिले आहे.

Team Global News Marathi: