आमदार सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनवर लावलेला दंड माफी प्रकरणी ठाण्यात आंदोलन

 

ठाणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीचे अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप लगावला आहेत. अशातच आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात उभारलेल्या छाबय्या विहंग गार्डन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण ठाणे महानगरपालिकेने २००८ मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता.

मात्र दुसरीकडे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन हा दंड माफ केला होता. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन भाजप आक्रमक झालीय. सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध केला होता तरीही राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे या विरोधात आज ठाण्यात भाजप कडून आंदोलन केलं गेलं.

अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी ३३ लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने २५ लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील १८ टक्के दराने व्याजाची एक कोटी २५ लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती. मात्र एकूण २१ कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडी सरकार आणि विरोधक मुद्दयावरून आमने-सामने येणार आहेत.

Team Global News Marathi: