Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

हात काळे करणाऱ्या व्यवसायातून समृध्दी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
November 24, 2022
in महाराष्ट्र
0
हात काळे करणाऱ्या व्यवसायातून समृध्दी

चंद्रसेन देशमुख,संपादक दिव्य मराठी उस्मानाबाद

परंडा रोडलगत अनाळा इथला दुमजली बंगला. हा बंगला आपलं लक्ष वेधून घेतो ते त्यावरचा ट्रॅक्टरमुळे. अंधारातही या ट्रॅक्टरचे दिवे सुरू असतात. हा बंगला अशोक भिलारे यांचा.

काही वर्षापूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून परंडा तालुक्याची ओळख होती.सिंचन प्रकल्पांमुळे चित्र पालटलं. ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, बागायती क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे. साहजिकच शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर आणि मागणी वाढली. नेमक्या याच काळात पांढरेवाढी (ता.परंडा) येथील अशोक भिलारे यांना रोजगाराची गरज होती. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर दुरूस्तीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. खरंतर गॅरेजचा व्यवसाय म्हणजे हात काळे करावे लागतात. त्यात कष्टाला अंत नाही.पण भिलारे यांनी हाच व्यवयास निवडला.

 

कौटंुबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडे गॅरेज टाकण्यासाठी भांडवल, स्वत:ची जागा नव्हती. पण मित्र, नातेवाईक यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी अनाळा इथं परंडा रोडलगत ७० हजारात दोन गंुठे जागा खरेदी केली. वर्ष २००१ मध्ये छोटंसं गॅरेज सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे ट्रॅक्टरच्या दुरूस्तीची कामं वाढत गेली. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत दुरूस्ती करत त्यांनी कठोर परिश्रम घेतले.

पुढे त्यांच्या कष्टाला फळ मिळत गेलं. हळहळू त्यांनी दुकानाचा विस्तार केला. त्यांनी दुकानालगत टप्प्याटप्प्यानं दीड एकर जमीन खरेदी केली. जागेत ४६ बाय ४८ जागेवर घर बांधलं. काही वर्षांपूर्वीच त्यांनी अनाळालगत मलकापूर शिवारात सात एकर जमीन खरेदी केली. ही जमीन बागायत करण्यासाठी त्यांनी इनगोंदा तलावावरून म्हणजे तीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन केली. या जमिनीत ते ऊस लागवड करणार आहेत.
बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना स्वत:चा आणि व्यवसायाचा अभिमान आहे.

अशोक भिलारे यांनी त्यांच्या बंगल्याच्या बांधकामादरम्यान दुसऱ्या मजल्यावरील टॉवरवर स्लॅब टाकला. जेणेकरून त्यावर अवजड ट्रॅक्टर सहज उभारता येऊ शकेल. ज्या ट्रॅक्टर दुरूस्तीतून जीवन बदलले त्या ट्रॅक्टरचा योग्य सन्मान झाला पाहिजे, या भावनेतून भिलारे यांनी ट्रॅक्टरला घराच्या उंच भागी स्थान दिलं. या बंगल्यातच त्यांचं ट्रॅक्टर गॅरेज असून,सहा मुलं कामावर आहेत.
आपण ट्रॅक्टरलाच लक्ष्मी मानतो म्हणून नवीन बंगल्यावर ट्रॅक्टर ठेवण्याची इच्छा होती.

सुरूवातीला सिमेंटचा ट्रॅक्टर राशीन(नगर) इथून बनवून आणण्याची योजना होती. मात्र, नंतर खराखुरा ट्रॅक्टर असावा, असं वाटल्यामुळे १ लाख ९ हजार रूपये किंमतीचा जुना ट्रॅक्टर त्यांनी आणला. ११ हजार रूपये खर्चून बार्शीवरून क्रेन मागवले. क्रेनने घरावर ट्रॅक्टर ठेवला आणि त्यानंतर त्याला रंगकाम केलं. बॅटरीसह सजावटीचा खर्च दोन लाखापर्यंत गेला.

”दररोज १५ मिनिटे ट्रॅक्टर सुरू ठेवतो,ट्रॅक्टरचे दर्शन घेतो,” असं भिलारे सांगतात. परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर दुरूस्तीचं प्रशिक्षण घेतलं. कंपनीत काम केलं आणि मग स्वत:चं गॅरेज सुरू केलं. दिवस पालटले. पण ज्या व्यवसायातून त्यांनी समृध्दी साधली त्या व्यवसायाबद्दल कमालीचा अभिमान जपण्यासाठी हे केल्याचं ते सांगतात.

#नवीउमेद #उस्मानाबाद #परंडा #ट्रॅक्टर #शेती

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: ट्रॅक्टरपरांडाबार्शीशेतकरी
ADVERTISEMENT
Next Post
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! १ जुलै रोजी हजर राहण्यासाठी ईडीने बजावले दुसरे समन्स

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group