खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची राज्य सरकारने दिली परवानगी !

 

मुंबई | राज्यात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेत तोडगा न निघाल्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरु असल्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे त्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतूक करणारे अव्वाच्या सव्वा दर आकारत असून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन सुरु आहे. शिवाजीनगर एसटी डेपो बाहेर अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने काढलेला जीआर मान्य नाही, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन सुरु आहे, असे ते म्हणाले. पुण्यातील शिवाजीनगर एसटी डेपोच्या बाहेर खासगी बसेस मोठ्या प्रमाणावर लागल्यात आणि त्यांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे.

औरंगाबाद, नाशिक जाणाऱ्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहे. दरम्यान, एसटीच्या पुणे विभागातील कर्मचार्‍यांनी दिलेल्या बंदची हाकमुळे सोमवारी एसटीच्या पुणे विभागाला ६० लाखांचा फटका बसला आहे. तर दैनंदिन एसटीने प्रवास करणार्‍या १ लाख २० हजार प्रवाशांची विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी मोठी फरफट झाली. तर सोमवारी नियोजित १६०० च्या घरात फेर्‍या रद्द झाल्या होत्या.

Team Global News Marathi: