पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो, त्यांचा आदर करावा, पातळी सोडून बोलणे चुकीचे – पंकजा मुंडे

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसनपूर्वी पंतप्रधान मोदी विरोधात वादग्रस्त विधान केले होते यावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यापाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा आपले मत मांडले आहे, तसेच केलेल्या विधानावर पटोले यांना टोला लगावला आहे.

पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलणे चुकीचे आहे, असे मत भाजपा नेत्या तथा माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. येवला दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंडे यांनी नाव न घेता पटोले यांच्यावर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना, ८ फेब्रुवारीला कोर्टात निर्णय लागेपर्यंत त्याची मी प्रतीक्षा करणार आहे.

Team Global News Marathi: