पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” ट्रेंड !

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून नाही तर विदेशातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जम्बो लसीकरणाच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यातच आता मोदी यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटर करून त्यात असे लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोदी जी.” असे ट्विट केले आहे.

तर दुसरीकडे या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या ‘युथ विंग’कडून भाजपच्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात प्रदर्शन करण्यात येतं आहे. ‘इंडिया युथ काँग्रेस’कडून १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय बेरोजगारी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतोय. देशातील वाढती बेरोजगारी पाहता हे आंदोलन उभारण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं भाजपकडून पुढचे २० दिवस ‘सेवा आणि समर्पण मोहीम’ राबवण्यात येणार आहे. याला प्रत्यूत्तर म्हणून काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगारी दिवस’ साजरा करण्यात येतोय. सोशल मीडियावरही याचा परिणाम दिसून येतोय. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरवर #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हा हॅशटॅग ट्रेन्डिंगवर आहे. #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस टॅग वापरून ‘दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तरुणांसोबत अनेक नेतेही यात सहभागी झाले आहेत.

Team Global News Marathi: