प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणासह नातेवाईकांचाही सामूहिक बलात्कार

पटना | फेसबुकरील प्रेमच लव्ह जिहाद बनल्याचा प्रकार छत्तीसगढमधील युवतीच्या बाबत घडला. एका युवकाच्या प्रेमात या तरुणीला नरकयातना भोगाव्या लागल्या. स्वत:ला प्रेमी म्हणविणाºया युवकासह त्याच्या वडीलांनी आणि नातेवाईकांनीही या युवतीवर बलात्कार केला.

संबंधित युवती ही छत्तीसगडमधील आहे. फेसबुकवर युवतीची बिहारमधील असलेल्या आरिज इकबाल याच्याशी आधी मैत्री झाले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमही झाले. यातूनच तो छत्तीसगढला गेला व लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला तो बिहारमध्ये घेऊन आला. तेथे त्याच्या वडिलांनी तिला सांगितले की, दानिश याच्याबरोबर तिला लग्न करावे लागेल.

दानिशने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवकाच्या वडिलांनी आणि अन्य एका नातेवाइकानेही तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटून ती कशीबशी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेली. तिथे तिने गुन्हा दाखल केला.

Team Global News Marathi: