एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा आधार, प्रवीण दरेकर यांचा आरोप

 

ड्रग्स प्रकरणात एनसीबी आणि समीर वानखेडे यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गाभीर स्वरूपाचे आरोप लगावला होते. याच मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सुद्धा चांगलेच तापलेले दिसून आले होते. याच मुद्द्यावरून भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर टीका केली आहे.

दरेकर म्हणाले की, दररोज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर खोटे, चुकीचे आरोप केले जात होते. ओढूनताणून दोषी ठरविण्याच्या या प्रयत्नांतूनच आता व्हिडिओ क्लिप आली असावी, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला.

यासंदर्भात दरेकर म्हणाले की, एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर ट्विट करून त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराचे वागणे चुकीचे आहे. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखविण्यासाठी त्या गोष्टी तयार केल्या जात नाहीत ना, असा संशय येतो, असेही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: