“प्रवीण दरेकर यांच्यावरील कारवाई ही सूड बुद्धीतूनच”; देवेंद्र फडणीस यांची टीका

 

मुंबई | विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. ‘आज जी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे. ती राज्य सरकारने सूड बुद्धीतून केलेली आहे. गुन्हा दाखल केला तरी आमचा आवाज दाबू शकत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज तोडणीच्या विषयावरून आक्रमक पवित्रा घेत भाजप आमदारांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घेतला. यावेळी त्यांनी सभात्याग करत बाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर आज मी मुंबै बँक मजूर घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक दरेकर यांनी बँकेच्या निवडणुकीवेळी जो मजूर म्हणून अर्ज दाखल केला होता तो काढून घेतला होता.

मी कालच अधिवेशनात चर्चेवेळी सांगितले होते कि राज्य सरकारकडून प्रवीण दरेकर यांच्यावर कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रवीण दरेकर यांच्यावरती जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण दरेकरांविरूध्द सुडबुध्दीने गुन्हा दाखल केला आहे. कितीही प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही मागे हटणार नाही, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Team Global News Marathi: