“प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर थोबाड रंगवू”

 

भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुरेख पुणे कर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रदेशावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर देत थेट थोबाड फोडण्याची धमकी दिली आहे. ‘तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांना दिला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं म्हणत प्रवीण दरेकरांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रुपाली चाकणकर यांनी जशास तसे उत्तर दिले. हे वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही’ असा सणसणीत टोला चाकणकर यांनी दरेकरांना लगावला. तसंच, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं तुम्ही म्हणाला, पण प्रवीणजी तुम्ही आणि तुमच्या पक्षात महिलांबद्दल नेहमी दुय्यम वागणूक देण्याची परंपरा आहे.

आपल्या बोलण्यातून ती घाण टपकत आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. आपल्या पक्षातील काही नेत्या आहे, त्यामुळे तुम्ही महिलांच्या कैवारी आहे, असं दाखवताय. त्यामुळे आज तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला. काय म्हणाले प्रवीण दरेकर? आज आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० वी जयंती. या निमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Team Global News Marathi: