प्रभू श्रीरामाने भाजपाला पैसे गोळा करायचे कंत्रात दिले आहे का ? – नाना पटोले

मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून या अधिवेशनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराच्या मुद्द्यांवरून भाजपाला चिमटा काढला आहे. एका व्यक्तीनं आपली भेट घेतली आणि राम मंदिरासाठी निधी देण्याबाबत आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्याचे नाना पटोले यांनी सभागृहात सांगितले होते.

पुढे याच मुद्द्यावरून बोलताना पटोलें म्हणाले की, राम मंदिर उभारणीसाठी कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत अशी विचारणा पटोले यांनी केली होती. प्रभू श्रीरामाने यांना कंत्रात दिले आहे का ? असा सवाल विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. यावरून भाजपाच्या आमदारांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत हिंमत असेल तर राम मंदिरावर चर्चा लावा असे आव्हान महाविकास आघाडी सरकारला दिले होते. त्यामुळे आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: