“वीज कनेक्शन तोडले, गावची गावे अंधारात जात आहेत आणि तुम्ही लग्नात नाचता?

 

नगर | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाह बंधनात अडकणार आहेत. पूर्वशी राऊत यांच्या विवाहानिमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि वधूचे वडील अर्थात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका गाण्यावर ठेका धरला होता. त्यावरून आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. लग्नात तुम्ही नृत्य करता, एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत, अशी घणाघाती टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

तसेच यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करताना महाविकास आघाडी सरकारला खोचक सवाल केले आहेत. ‘वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावं अंधारात जात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?, असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं. त्यातच आता संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह असल्याने रेनेसाँ या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमावेळी दोन्ही दिग्गज नेत्यांनी गाण्यावर ठेका धरला होता.

Team Global News Marathi: