पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड याने पाच कोटी दिले आहेत, पुजाच्या चुलत आजीचा दावा

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. याच मुद्द्यावरून विरोधक सुद्धा आक्रमक झाले होते. या प्रकरणी नाव गुंतल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता या प्रकरणी पूजाच्या चुलत आजीने मोठा खुलासा केला आहे.

त्या म्हणाल्या की, पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही असा आरोप यावेळी बोलताना पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यावेळी उपस्थित होत्या.

पुढे ‘त्या’ म्हणाल्या की, पूजा चव्हाणच्या आत्महत्यांच्या घटनेत तिचे आई वडील अद्यापही शांत असून काही बोलत नाही. त्या दोघांना संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये देण्यात आले असून त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्यवेळी ते पुरावे समोर आणणार आहे असे त्या म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागणार आहे. तसीच माझ्या जीवाला धोका असल्याचे सुद्धा पूजाच्या चुलत आजीने सांगितले आहे.

Team Global News Marathi: